जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।
राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या घटना शुल्लक कारणाने रागातून घडत असल्याच्या अनेकदा समोर आली असतांना एक धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे. गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला हि घटना घडली असून आता याच्या वेगळ वळण लागल्याचे दिसत आहे. तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक असं वळण लागलं आहे. मुलीची हत्या करून जन्मदात्या आईनेच अज्ञात महिलेकडून मुलीचा खून झाल्याचा बनाव रचला होता.
आईनेच या मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. सासरच्याकडून होणाऱ्या जाचांला कंटाळून जन्मदात्या आईनेच या मुलीची गळा चिरून हत्या केलीय. नाशिकच्या धृवनगर परिसरामध्ये ध्रुवांषु रोकडे या तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती. तीन वर्षाच्या चिमुकलीचा शत्रू कोण असावा ? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळ जनक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर अज्ञात महिलेने आपल्याला बेशुद्ध करून तिची गळा चिरून हत्या केली असा बनाव रचला होता.
मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाची चौकशी केली. यात हत्या झालेल्या मुलीची आई संशयित युक्ता रोकडे हिनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. सासरचे लोक मुलीला बापावर गेली बरे झाले असे म्हणून आईची छळवणूक करत होते. यामुळे आईनेच मुली विषयी मनात द्वेष निर्माण करत पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली. घटनास्थळावरील परिस्थिती आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आई बनाव करत असल्याचा संशय आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी आईचे व्हाट्सअप चॅट आणि इतर माहितीच्या आधारावर या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आला आहे. या घटनेन शहरात खळबळ उडाली आहे.
