जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
चोपडा शहरातील ५० वर्षीय सरलाबाई ओंकार चौधरी या ३१ रोजी ११ वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या जिन्यावरून पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुजर अळी भागातील रहिवासी सरलाबाई ओंकार चौधरी (वय ५०) या ३१ रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील जिन्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना शेजारी राहत असलेले सागर चौधरी यांनी उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. तृप्ती पाटील यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास दीपक विसावे करत आहेत.