जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील किशोर काशिनाथ काळे (वय ३६) या तरुणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी किशोर काळे हा तरुण २२ रोजी घरात कुणाला काहिही न सांगता निघून गेला होता. त्याचे नातेवाईक, मित्र परिवार त्याचा शोध घेत असतांना सिध्देश्वर नगर येथील नाथ मंदिराच्या पाठीमागे प्रवीण भंगाळे यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात बुडून त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले आहे. मयत किशोर काळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी जितेंद्र काशिनाय काळे यांच्या माहितीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो.हे.कॉ. सुभाष सपकाळ करत आहेत.