जळगाव मिरर | ७ सप्टेबर २०२४
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुण साजन भगवान गायकवाड (वय ३१, रा. असोदा, ता. जळगाव) या तरुणावर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. आठ दिवसांपासून मृत्यूसोबत सुरु असलेली त्याची झुंज गुरुवारी अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा गावात साजन भगवान गायकवाड हा तरुण वास्तव्यास होता. दि. २८ ऑगस्ट रोजी त्याने काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तरुणावर उपचार सुरु होते. दरम्यान, साजन गायकवाड याच्यावर उपचार सुरु असतांना दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याची मृत्यूसोबत असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषीत केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.