जळगाव मिरर / ३ मार्च २०२३ ।
देशात तरूणापासून ते थेट वृद्धांना प्रेम प्रकरणात लुटण्याची टोळी देशात निर्माण झाल्याचे चित्र गेल्या सहा महिन्यापासून सक्रीय झाल्याने या गुन्ह्याची संख्या मोठ्या संख्येने वाढत गेलेली आहे. अशीच एक घटना छत्तीसगडच्या जशपूर येथून फसवणुकीची एक थक्क करणारी बातमी उजेडात आली आहे. येथे एका तरुणाने मुलीचा आवाज काढून सरकारी शाळेतील एका शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. एक नव्हे तर तब्बल 16 महिन्यांपर्यंत त्याने त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. एवढेच नव्हे तर त्यांच्यापुढे लग्नाचा प्रस्तावही ठेवला. शिक्षक आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने हळू-हळू त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 60 हजार रुपयांची रक्कम उकळली.
पीडित शिक्षकाने सांगितले की, आरोपी तरुणाने माझी मुलगी बनून फसवणूक केली. त्याने मला भेटण्यासाठी बोलावले. मी माझ्या ड्रीम गर्ल अर्थात स्वप्न सुंदरीशी भेटण्यासाठी खूप उताविळ झालो होतो. कारण, मी तिच्यावर आतापर्यंत लाखो रुपयेही उधळले होते. पण आपली प्रेयसी मुलगी नसून मुलगा असल्याचे त्याला जेव्हा समजले तेव्हा माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी या प्रकरणी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी सांगितले की, पीडित शिक्षक विद्याचरण पैकरा रायगड जिल्ह्यातील लैलुंगा ठाणे हद्दीतील एका गावचा आहे. त्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात निष्पन्न झाले की, विद्याचरण ज्या व्यक्तीशी प्रेयसी समजून फोनवर बोलत होता, प्रत्यक्षात तो मुलगी नव्हे तर मुलगा होता. आरोपी तरुणाने ड्रीम गर्ल बनून पीडित शिक्षकासह अनेकांना ब्लॅकमेल करून स्वतःचे उखळ पांढरे करवून घेतले आहे.
विद्याचरण पैकरा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, नोव्हेंबर 2021 मध्ये फेसबूकवर त्याची भेट सविता पैकरा नामक एका मुलीशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फेसबूक मेसेंजरच्या माध्यमातून बातचित सुरू झाली. हळू-हळू त्यांची मैत्री वाढत गेली. त्यांच्यात व्हॉट्सएप संवादही वाढला. चॅटिंग करताना त्यांनी एकमेकांपुढे प्रेमाचा प्रस्ताव मांडला. कथित सविता पैकरा यांनी विद्याचरण यांना आपण धरमजयगड तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. आरोपी तरुण मुलीचा आवाज काढण्यात एवढा तरबेज होता की, विद्याचरण यांना आपण केव्हाच एका मुलीशी बोलत असल्याचे वाटले नाही.
या काळात आरोपी तरुणाने त्यांच्याकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळले. विद्याचरण यांनी हळू-हळू त्यांना 5 लाख 20 हजार रुपये दिले. या प्रकरणी पोलिस अधिकारी संदीप मित्तल यांनी सांगितले की, पीडित विद्याचरण यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याला नोव्हेबंर 2021 मध्ये सविता पँकरा नामक तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्या दोघांत मेसेंजर व फोनवर चर्चा सुरू झाली. आरोपीने मुलगी बनून त्यांच्याकडून 5 लाखांहून अधिकची रक्कम उकळली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 420 व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी तपास सुरू असून, त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.