जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४
शहरातील हॉटेल महिंद्रा येथे थांबलेल्या एका तरूणाने रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण भिका वाघ (वय ३०) रा. सुदामा नगर, भोपाल मध्यप्रदेश असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण वाघ हा तरूण आपल्या आईवडील आणि लहान बहिण यांच्यासोबत भोपाल येथील सुदामा नगरात वास्तव्याला होता. बांधकामाचे साहित्य पुरविण्याचा व्यावसाय तो करत होता. दरम्यान, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भूषण वाघ हा कामाच्या निमित्ताने जळगावात आलेला होता. जळगावातील हॉटेल महिंद्रा येथे रूममध्ये राहत होता. दरम्यान गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुकींग केलेल्या रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. हॉटेल मालक यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.