जळगाव मिरर | ५ मार्च २०२४
काकांचा मुलगा दवाखान्यात अॅडमीट असल्याने काकांसोबत जेवणाचा डबा घेवून येणाऱ्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार संजोग सुरेश सपकाळे (वय २०, रा. गाढोदा, ता. जळगाव) याच्या अंगावरुन ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे काका नवल बिसन सपकाळे (वय ४७, रा. गाढोदा, ता. जळगाव) हे जखमी झाले आहे. ही घटना सोमवार दि. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ घडली. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांच्या मुलाला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेवून नवल सपकाळे आणि संजोद हे दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले. खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे जात असतांना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका पुतणे हे रस्त्यावर कोसळून तो मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले. तर त्याचे काका यांना दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहे.
अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. परंतु दुर्देवी काळाने त्याच्यावर झड’ घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक केली जात होती. यावेळी त्याच्च कुटुंबियांनी एकच आक्रोश केल होता. संजोग याच्या पश्चा आई, वडील, मोठा भाऊ अस परिवार आहे.