जळगाव मिरर / १ मार्च २०२३ ।
आजपासून मार्च महिना सुरु झाला आहे. आता लवकरच पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली 31 मार्चची अंतिम मुदतही जवळ आली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नुकतेच जारी केलेल्या माहितीत म्हटले की,” जे पॅनकार्डधारक या मुदतीपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणार नाहीत, त्यांचे पॅन इनऍक्टिव्ह केले जातील. त्यामुळे उशीर न करता आजच आपले पॅन-आधार लिंक करा.”
आधार कार्डमध्ये UIDAI द्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला जारी केलेला 12-अंकी नंबर असतो. हा एक ओळख क्रमांक आहे. भारताचा रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करता येते. जी मोफत आहे. एकदा नावनोंदणी केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचे डिटेल्स डेटाबेसमध्ये कायमचे सेव्ह केले जातात. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त आधार कार्ड काढता येणार नाहीत.
जर आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर त्याविषयी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवणे आवश्यक आहे. आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून हे करता येईल. जर आपले पॅन-आधार लिंकिंग केले नाही तर आपले पॅन ‘इनऑपरेटिव्ह’ होईल.