
जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२४
सोबत राहणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठवून वारंवार तिच्याकडे शरिरसुखाची मागणी करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून संशयित फरहान उर्फ असलम शब्बीर शेख हा फरार होता. एमआयडीसी पोलिसांनी या संशयिताच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला आपल्या मुलाबाळांसह वास्तव्यास असून तीचा पती २०१८ पासून घरातून कोठेतरी निघून गेलेला आहे. त्यानंतर महिलेची सन २०१९ मध्ये फरहान उर्फ असलम शब्बीर शेख याच्यासोबत ओळख झाली. तेव्हापासून तो महिलेसोबतच वास्तव्यास आहे. फरहान याची महिलेच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवत होता, त्याने वारंवार त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिच्या आईसह भावांना मारुन टाकण्याची त्याने धमकी दिली होती.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरीक्षक रविंद्र गिरासे, पो. उप.निरी. दीपक जगदाळे, स.फौ. अतुल वंजारी, पो. हे.कॉ. राजेंद्र कांडेलकर, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील, इमरान बेग यांच्या पथकाने कली. सशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अल्पवयीन मुलगी घरात असतांना दि. ५ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित फरहान याने त्या मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी तीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तेव्हापासून संशयित फरहान शेख हा फरार द होता. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयिताला सोमवार दि. १५ एप्रिल रोजी अटक केली.