अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील एका तरुणाने थेट रशिया या ठिकाणी एमबीबीएसची पदवी घेवून पुन्हा अमळनेर शहरात परतल्याने अमळनेरकरानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कंजर भाट समाजातील सर्वसामान्य कुटुंबातून डॉ.नितेश मांछरे या तरुणाने एमबीबीएसची पदवी रशिया येथे विद्यापीठात मिळवली आहे. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अतिशय जिद्दी व चिकाटीने आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले लहानपणापासूनच आई-वडिलांच्या स्वप्न होतं मुलाला डॉक्टर बनवायचं होत.
शरद पवार इंटरनॅशनल स्कूल कळवण येथे डॉक्टर नितेश माछरे यांनी आपलं शिक्षण पूर्ण करीत त्यानंतर जिद्द व चिकाटीने कंजर भाट समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला, व या समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे अमळनेर हे संतांची भूमी आहे या भूमीतून या समाजातील हा दुसरा डॉक्टर झालेला आहे रशिया विद्यापीठात त्याने आपली एमबीबीएस ची डिग्री डॉक्टर नितेश माछरे यांनी प्राप्त केली. एकीकडे समाजातील लोकांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे आजही समाजातील काही कुटुंबाची ही परिस्थिती आहे पण त्या परिस्थितीलाही न घाबरता आपल्या मेहनतीच्या बळावर राजेश माछरे यांनी दिवस रात्र एक करून आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि आज त्यांच्या स्वप्नांना खरोखर रंग मिळाले. त्यांच्या वडिलांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे सहा वर्ष रशिया येथे आपल्या फॅमिली पासून दूर राहून तो यश मिळविला. दिनाक २२ जून रोजी डॉ.नितेश माछरे हे घरी परतले असून कंजर समाजातील मुलं हे जीनियस असतात हे लोकांना दाखवून दिले. व कोरोना काळात डॉ.अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक वर्ष प्रॅक्टिस देखील केली आहे. कंजरभाट समाज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्था मार्फत त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला खरोखर कंजर भाट समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.