जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असलेला विठ्ठल नारायण पाटील यांचा २६ वर्षीय मुलगा सिद्धांत विठ्ठल पाटील हा अमेरिकेत राहत होता. दि. ४ जुलै रोजी सुट्टी निमित्ताने मित्रांसोबत – मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्क येथे फिरायला गेला होता. पहाडावर हायकिंग करत असतांना पाय निसटून खाडीत पडला होता. तब्बल २७ दिवसानंतर त्या तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि , रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील विठ्ठल पाटील हे पुण्यात वास्तवयास आहे. त्यांचा मुलगा सिद्धांत हा नोकरीनिमित्त अमेरीकेत स्थायिक झाला होता. सुट्टी निमित्ताने मित्रांसोबत मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्क येथे फिरायला गेला होता. पहाडावर हायकिंग करत असतांना पाय निसटून खाडीत पडला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. त्याचे कुटुंबिय हे आशा लावून बसले होते. मात्र दि.४ ऑगस्ट रोजी पार्क मध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला एक मृतदेह दिसून आला. त्याने तात्काळ तिथल्या रेंजर्नना कळविले त्यानंतर कपडे आणि सापडलेले गिअर यावरून सिद्धांत ची ओळख पटविण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेसाठी तसेच सिद्धांतचे पार्थिव किंवा अवशेष भारतात आणण्यासाठी पुणेस्तीत मामा प्रितेश चौधरी अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.