
अमळनेर : विक्की उत्तम जाधव

शहरातील दाजीबानगर मधील अक्षय भिल या युवकाचा खुनाच्या निषेधार्थ तालुक्यातील भिल्ल समाजाने तहसील कार्यालया समोर तीन तें चार तास रास्ता रोको आंदोलन करत आरोपीना फाशी दया किंवा आमच्यासमोर हजर करा, आशी मागणी आंदोलकांनी केली.
दाजीबानगर परिसरात जोरात गाणे वाजवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद होऊन त्यातून एकाचा खून व एकाला गंभीर जखमी केल्याची घटना २४ रोजी रात्री घडली. अक्षय राजू भिल असे युवकाचे नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने २५ रोजी सकाळी संतप्त भिल्ल समाज शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून व तालुक्यातून एकत्र येत तहसील कार्यालयजवळ रस्ता रोको केला. खुनातील आरोपीना आमच्यापुढे हजर करा म्हणत जमाव संतापला आणि येणाऱ्या जाणाऱ्याना अडवत वाहना वर किरकोळ दगडफेक केली. घटनास्थळी डी वाय एस पी राकेश जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रभारी तहसीलदार अमोल पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे आदि उपस्थित होते.
सर्व आरोपीवर योग्य आणि कड़क कार्यवाही करू असे सांगूनही जमाव ऐकायला तयार नव्हता. त्यांनतर जमावाने तहसिल कार्यलय जवळ मुख्य रस्त्याच्या तिन्ही बाजूने वाहतूक बंद केली. ठीक-ठिकाणी टायर जाळण्यात आले. विविध संघटना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावरही आंदोलनकर्ते आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत . अखेरीस चार पाच आरोपी ना पोलिसांनी अटक केली त्यां नंतर जमाव शांत झाला.




















