जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।
केंद्र शासनाकडून होत असलेल्या सततच्या गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हातर्फे केंद्र शासनाविरोधात आकाशवाणी चौक येथे रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलनात गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी सिलेंडर व निषेधाच्या मजकूराचे लिहिलेले फलक दाखवुन मोदी सरकार विरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र शासनाने लवकरात लवकर गॅस दरवाढ मागे घेऊन गॅस दर कमी न केल्यास अजुन तीव्र व व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी , अमोल कोल्हे , इब्राहीम तडवी , रमेश बहारे , किरण राजपूत , मिनाक्षीताई चव्हाण , सीमाताई गोसावी , लताताई सावकारे , ऍड. जयश्रीताई पाटील,रिझवान खाटीक,रेखाताई जाधव , छायाताई सावळे, वर्षाताई राजपूत , भगवान सोनवणे ,रहीम तडवी,चेतन पवार,योगेश साळी , हितेश जावळे ,राहुल टोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
