जळगाव मिरर | १५ ओक्टोबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी नदीसह तलावात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना नियमित घडत असतांना नुकतेच नागपूर रामेटकमधील पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ते सर्वजण कालव्यात अंघोळीसाठी उतरले. मात्र, चार विद्यार्थी वाहून गेले. त्या चारही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर चार जण थोडक्यात बचावले. मनदीप पाटील (१७), मयंक मेश्राम (१४), अनंत साबारे (१३), मयूर बागरे (१५) अशी मृतांची नावे असून मृतदेहांचा शोध सुरू आहे.
रामटेकजवळ बोरी गाव असून, येथे इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय आहे. येथे पाचवी ते बारावीपर्यंतची मुले शिकतात. त्या शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शाळेला सुटी होती. त्यामुळे विद्यार्थी पेंच नदीच्या कालव्यावर गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकनजीक बोरी गाव (घोटी टोक) असून येथे इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय आहे. येथे पाचवी ते बारावी पर्यंतची मुले शिकतात. त्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शाळेला सुटी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेंच नदीच्या कालव्यावर गेले. दुपारी तेथे पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे आठही जण कालव्यात उतरले. मयंक मेश्राम, अनंत साबारे आणि मयूर बागरे यांना पोहणे येत नसतानाही ते खोल पाण्यात गेले.
मनदीपने त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयूरने मनदीपचा हात पकडला. चारही मित्र वाहून जात असल्याचे बघून उर्वरित चौघे लगेच पाण्याबाहेर निघाले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, जंगल असल्यामुळे मदतीसाठी कुणीही आले नाही. घाबरलेली चारही मुले वसतिगृहात परत आली. त्यांनी अधीक्षकांना माहिती दिली. त्यांनी लगेच रामटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांना माहिती दिली.
दसऱ्या निमित्त लागोपाठ तीन दिवसाच्या शाळेल्या सुटी आल्यामुळे काही विद्यार्थी गावाला निघून गेले. तर राहिलेल्यांपैकी शाळेला सुटी असल्यामुळे आठ मुले ही शाळेच्या मागे असलेल्या पेंच कालव्यात पोहायला गेले. त्यातच ही दुदैवी घटना घडली. तर सोबत असलेले कमलेश बाबूजी देबुलकर (वय १४), ओम विलास कारामोरे (वय १६), यश शंकर हरडे (वय १५) व गणेश राजू आजणकर (वय १४) हे पाण्यातून बाहेर आल्यामुळे वाचले. शाळेच्या प्रशासनाने लगेच याची माहिती रामटेक पोलीस ठाण्याला दिली. पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्यामुळे शोध कार्यास अडथळा निर्माण होत होता. कॅनल बंद करीत शोध सुरू आहे. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे. शाळेच्या अधीक्षकांनी सांगितले की चपराशी बाहेर काम करीत होता. मुले शाळेच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून गेली.