अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील एका दुकानाच्या गल्लीतून पायी जाणाऱ्या ७७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील पोत दाखवा म्हणून सांगत भामट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील रहिवासी असलेल्या अंजवाबाई साहेबराव पाटील (वय ७७) या वृद्ध महिला सोमवारी शहरातील राणे झेरॉक्स दुकानाच्या गल्लीतून पायी जात असताना अज्ञात दोन जणांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याची पोत दाखवा, असे सांगून त्यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. या संदर्भात वृद्धेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन भामट्यांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
