अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरात एका घरातून चोरट्यांनी सात लाखांचा डल्ला मारला. तर दुसरीकडे तर घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची फेकत तिच्या हातातील चार तोळ्यांच्या बांगड्यासह दागिने लांबवले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आर.के.नगर परिसरात २० रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. भटू दौलत पाटील हे वासरे येथे गेले होते. त्यावेळी घरातील ७५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४ लाख ७० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मिरचीची पूड सुधा जैन (रा. न्यू प्लॉट) ह्या शुक्रवारी सायंकाळी घरात बसल्या होत्या. त्याचवेळी तोंडावर फडके बांधून आलेल्या महिलेने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या हातातल्या चार तोळ्याच्या बांगड्या ओढून पोबारा केला.