जळगाव मिरर । १ फेब्रुवारी २०२३।
अर्थसंकल्प २०२३ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी अमृत काळातील पहिलं बजेट सादर केलं. हे बजेट देशाला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाणार आहे. आपल्या सरकारने शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्राच्या हिताचा सांगोपांग विचार करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या अर्थसंकल्पामुळे विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी वर्गाला याचा फायदा होईल.
आपल्या सरकारने करपात्र रक्कम ५ लाखावरून ७ लाख करत सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. तरुणांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी, कौशल्य विकास केंद्रांमध्ये वाढ आणि 47 लाख युवकांना स्टायपेंड ज्याने ते सक्षम आणि स्वावलंबी बनवेल. २०१४ नंतर मोदी सरकारने देशात मेडिकल कॉलेजची संख्या लक्षणीय पद्धतीने वाढवली आता देशभरात १५७ नर्सिंग कॉलेजेस उभारण्याची अर्थसंकल्पात घोषणा झाल्याने वैद्यकीय क्षेत्राला “बूस्टर डोस” मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात देशातील सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. तमाम देशवासीयांच्या वतीने केंद्र सरकारचे मन:पूर्वक आभार!
– आमदार मंगेश रमेश चव्हाण