जळगाव मिरर | १६ जुलै २०२३
जळगाव शहरातून सिहोर येथे जाणाऱ्या तरुणांच्या वाहनाचा सेंधवा येथे टायर फुटल्याने भीषण अपघातात चारचाकीचे टायर फुटल्याने वाहन उलटले यात जळगाव येथील एक तरुण ठार तर इतर पाच जण जखमी असून, त्यातील एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.
जळगाव शहरातील सहा जण १५ जुलै शनिवार रोजी चारचाकी वाहनाने (एमएच १९ डीजे ७७७३) सिहोर येथे जात होते. संध्याकाळी सेंधवाजवळ वाहनाचे टायर फुटले व हे वाहन उलटले. यात सहापैकी एक तरुण जागीच ठार झाला इतर पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. शहरातील काही मित्रमंडळी व अन्य काही जण याविषयी खात्री करीत होते. मात्र, केवळ एक जण ठार झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरातील सुरज रामेश्वर जोमाळकर असल्याचे समजते.