जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
देशभरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची नियमित मालिका सुरु असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीमध्ये जोरदार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये हेमंत गोडसे हे सुदैवाने बजावले आहेत. एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरात ठोकर मारली. हा अपघात भीषण होता. मात्र यामध्ये गोडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांच्या गाडीचे बरेच नुकसान झालं आहे.
संसदेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे संसदेत गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते निवासस्थानाकडे परतत असताना हा अपघात झाल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. दिल्लीमधील बी. डी. मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवजयंती निमित्त दिल्लीमध्ये देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये संसदेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे हे राजधानी मध्ये दाखल झाले होते. संसदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या निवासस्थानाकडे परत जात होते. याच दरम्यान एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून एखाद्या येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचं दिसून येतं. मात्र यात सुदैवाने हेमंत गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.