जळगाव मिरर | १९ जून २०२५
मॉर्निंग वॉक करीत असताना दुचाकीने धडक दिल्यामुळे सतिष एकनाथ सुलक्षणे (वय ५६, रा. नागेश्वर कॉलनी) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नागेश्वर कॉलनीत राहणारे सतिष सुलक्षणे हे डीटीपी ऑपरेटर आहे. सोमवार दि. १६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. मायादेवी मंदिराजवळ आले असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. ते गौरांग सुलक्षणे यांचे वडील होत.




















