• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

युवा संघर्ष यात्राच्या प्रभारीपदी उमेश पाटील यांची नियुक्ती !

युवांच्या विविध प्रश्नांवर आ.रोहित पवार यांची पुणे ते नागपूरपर्यंत काढणार पायी युवा संघर्ष यात्रा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 14, 2023
in जळगाव ग्रामीण
0
युवा संघर्ष यात्राच्या प्रभारीपदी उमेश पाटील यांची नियुक्ती !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

युवा संघर्ष यात्रा च्या प्रभारी पदी श्री उमेश पाटील यांची आज पुणे येथे आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.आ. रोहित दादा पवार हे 24 ऑक्टोबर पासून युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पुणे येथून करणार असून त्याचा शेवट 6 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. 820 km. एकूण अंतर 42 दिवसात पूर्ण होणार आहे. संपूर्ण बेचाळीस दिवस आमदार रोहित दादा पवार हे पायी चालणार आहेत व त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने युवक पदयात्रेत सहभाग घेणार आहेत. त्या पदयात्रेच्या नियोजनासाठी श्री उमेश पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील बदललेल्या राजकारणामुळे राज्यातील तरुणांची राजकारणाकडे पाहण्याची मानसिकता ही बदलत चालली आहे.तसेच तरुणांचे अनेक प्रश्न हे राज्य सरकारकडे प्रलंबित असून तरुणाच्या विविध प्रश्न हे लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे येत्या 24 तारखेपासून दसऱ्याच्या दिवसापासून पुणे ते नागपूर असा पायी पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

आज राज्यात शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना बसत आहे. शासनाच्या या धोरणांचा राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अशातच राज्याच्या विविध भागात युवावर्ग आंदोलन देखील करत आहे. परंतु सरकार मात्र आपल्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे युवा वर्गाच्या या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फी परवडत नसल्याने फी कमी करण्याची मागणी विधानसभेत आम्ही आग्रहीपणे मांडली यावेळी सिरीयसनेस यावा यासाठी परीक्षा फी १००० रुपये ठेवल्याचे सरकारने सांगितले. पेपरफुटी संदर्भात सांगितलं तर सरकार हक्क भंग आणण्याची भाषा करते, कंत्राटी भरतीचा मुद्दा मांडला तर सरकार सांगते एका कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कर्मचारी काम करतील.

एकूणच सरकारच्या संवेदना संपल्या असून सरकार युवकांना गृहीत धरून चालत आहे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही आदरणीय पवार साहेबांशी याबाबत चर्चा केली आणि यावेळी पवार साहेबांनी राज्यव्यापी युवा संघर्ष यात्रा काढून युवांशी संवाद साधण्याच्या सूचना आम्हाला केल्या त्यानुसारच राज्यातील तमाम तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि युवा वर्गाला पाठिंबा देण्यासाठी एका नवीन उपक्रमाची सुरुवात आपण करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

राजकारणात आल्यापासून युवकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतोय. सद्यस्थितीत राजकारणाची पातळी घसरत असल्याने आपण राजकारणात का आलो असा प्रश्न मनात आला होता. पण हार मानून घरी बसण्यापेक्षा लढत राहायचे आणि काम करायचे असा निर्णय घेतला. ‘युवकांचे प्रश्न सुटत नाही त्यासाठी काय केले पाहिजे’, याबाबत शरद पवार यांच्याशी नुकतीच चर्चा केली. त्यावर ‘युवकांचे प्रश्न हातात घ्या. त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा’, असा सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी युवकांशी राज्यभर संपर्क साधण्यासाठी संपर्कयात्रा काढता येईल, असे मनात आले. कुटुंबांशी, पत्नीशी बोललो. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यामुळे युवकांच्या प्रश्नांसाठी ‘युवा संघर्ष यात्रा’ ही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. या पदयात्रेच्या नियोजनासाठी श्री उमेश पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Tags: #amalner#rohitpawaryuva sangharsh yatra

Related Posts

अमळनेरात महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा
जळगाव ग्रामीण

अमळनेरात महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा

November 29, 2023
३४ वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र ; जुन्या आठवणींना दिला उजाळा
जळगाव ग्रामीण

३४ वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र ; जुन्या आठवणींना दिला उजाळा

November 28, 2023
जळगावात पाचव्या मजल्यावरून पडताच तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
जळगाव ग्रामीण

पत्रकार व नागरिकांसाठी मल्टिपर्पज कम्युनिटी हॉल आकारास येणार

November 28, 2023
राज्यस्तरीय धोबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात
जळगाव ग्रामीण

राज्यस्तरीय धोबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

November 27, 2023
अमळनेरात आ.खडसेंच्या पोस्टरला मारले कार्यकर्त्यांनी जोडे !
जळगाव ग्रामीण

अमळनेरात आ.खडसेंच्या पोस्टरला मारले कार्यकर्त्यांनी जोडे !

November 26, 2023
अमळनेरात दोन दिवसीय लोकप्रिय कविकट्टा !
जळगाव ग्रामीण

अमळनेरात दोन दिवसीय लोकप्रिय कविकट्टा !

November 26, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

April 15, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिसांची मोठी कारवाई : जिल्ह्यात तब्बल २० किलो लाख रुपयांचा गांजा जप्त !

पोलिसांची मोठी कारवाई : जिल्ह्यात तब्बल २० किलो लाख रुपयांचा गांजा जप्त !

November 30, 2023
खळजनक : जिल्ह्यात धावत्या प्रवाशाला रेल्वेतून ढकलले

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : एकमार्गी विशेष गाडी

November 30, 2023
जुन्या ओळखीतून तुमचा आज मोठा फायदा होणार !

जुन्या ओळखीतून तुमचा आज मोठा फायदा होणार !

November 30, 2023
गरिबांसाठी आनंदाची बातमी : आणखी ५ वर्षे मिळणार मोफत रेशन !

आम्हाला कोणीही रोखू शकत नाही : केंद्रीय गृहमंत्री शाह

November 29, 2023

Recent News

पोलिसांची मोठी कारवाई : जिल्ह्यात तब्बल २० किलो लाख रुपयांचा गांजा जप्त !

पोलिसांची मोठी कारवाई : जिल्ह्यात तब्बल २० किलो लाख रुपयांचा गांजा जप्त !

November 30, 2023
खळजनक : जिल्ह्यात धावत्या प्रवाशाला रेल्वेतून ढकलले

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : एकमार्गी विशेष गाडी

November 30, 2023
जुन्या ओळखीतून तुमचा आज मोठा फायदा होणार !

जुन्या ओळखीतून तुमचा आज मोठा फायदा होणार !

November 30, 2023
गरिबांसाठी आनंदाची बातमी : आणखी ५ वर्षे मिळणार मोफत रेशन !

आम्हाला कोणीही रोखू शकत नाही : केंद्रीय गृहमंत्री शाह

November 29, 2023

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group