जळगाव मिरर / २३ जानेवारी २०२३
जळगाव शहरात दिनांक २१ जानेवारीपासून सुरू झालेल्या शिंपी समाज हितावर्धक संस्थेच्या अमृत महोत्सवाचा समारोप २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा व दिंडीने झाला. ह.भ.प.एकनाथ महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सकाळी नऊ वाजता गोलाणी मार्केट येथील हनुमान मंदिरापासून बगीमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज त्यांचे चिरंजीव कु. रत्ननाभ आईसाहेब विजया नामदास तसेच संत नामदेवांच्या वेशभुशेत ओम भांडारकर व विठ्ठलाच्या राहुल शिंपी हे होते. भव्य शोभायात्रे मुख्य आकर्षण महिलांच्या लेझीम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच युवकांनी एकसारखे कपडे परिधान करून महिला व पुरुषांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान केले होते. भव्य शोभायात्रा व पालखी सोहळा सकाळी ११:३० वाजता स्व.रामकिसन शेठ सोनवणे नगरीमध्ये बालगंधर्व नाट्यगृह येथे आल्यावर शहर महिला मंडळाच्यावतीने भव्य महा हळदि-कुंकू कार्यक्रमाने महिलांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन एकनाथ महाराज राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार ,प्रशांत महाजन, दिनेश बाविस्कर, मुकूंद मांडगे डी व्ही बिरारी ,प्रमोद शिंपी दिलीप अन्ना, मनोज देवरे, हे मंचावर उपस्थित होते. प्रस्ताविक मुकुंद मेटकर यांनी केले व राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार स्वागत अध्यक्ष विवेक जगताप समाजाध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे कार्याध्यक्ष शरदराव बिरारी,सचिव अनिल खैरनार, शिवाजीराव शिंपी, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, महिला अध्यक्ष नयनाताई सूर्यकांत निकम, मनोज भांडारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ह भ प एकनाथ महाराज यांनी सांगितले की हितवर्धक संस्था 75 व्या वर्षात पदार्पण केले असून संस्थेने अनेक सामाजिक जनहितार्थ लोकहितार्थ उपक्रम राबवत आहे सर्वसामान्य समाजाचे हित साधणारी ही हितवर्धक संस्था असून आता सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सूरू करित आहे. तसेच समाजाच्यावतीने शासनस्तरावर विविध मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशाही या ठिकाणी ठराव पारित करण्यात आले यामध्ये संत नामदेव महाराजांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी पंढरपूर ते घुमान रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी नामदेव महाराजांच्या नावाने वारकरी संप्रदायाला पुरस्कार देण्यात यावे असे अनेक विषेश ठराव मांडण्यात आले समाज एक संघ संघटित असल्यानेच संस्था प्रगती करीत आहे असे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहरातील माजी अध्यक्ष यांचा तसेच विषय विशेष गौरव केलेल्या समाज रत्न म्हणून उत्तर व अखिल भारतीय माजी अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रसंगी सांस्कृतिक व खान्देश संस्कृती याविषयी महिलांचे कार्यक्रम झाले तसेच दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या शिंपी क्रिकेट लीगचे लॉन्चिंग करण्यात आले. या दोन दिवसाच्या कार्यक्रमाला समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने प्रतिसाद दिला व दोन दिवस हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. रात्री आठ वाजता पसायदान व वंदे मातरमाने कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील सिनेमा कलावंत सचिन जाधव प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सोनवणे, दिलीप सोनवणे, प्रदीप शिंपी, सुरेश बागुल, शैलेंद्र सोनवणे , गणेश सोनवणे, चेतन पवार, सुधाकर कापुरे, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, महिला अध्यक्ष रेखाताई निकुंभ, कुसुमताई बिरारी, आशा जगताप, माधुरी मेटकर, माधुरी शिंपी, गणेश सोनवणे, ऋषिकेश शिंपी, चार्ली शिंपी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.