जळगाव मिरर । २२ जानेवारी २०२३ ।
शहरातील नवीन बस स्थानक परिसरातून महिलेकडून अनोळखी इसमाने ५ हजार रुपयाची चोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नवीन बस स्थानकावर दि २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथील रहिवासी असलेली महिला रोहिणी प्रदीप कुमावत (वय३०) यांच्याकडे असलेले ५ हजार रुपयांची अनोळखी इसमाने ते रोख रक्कम चोरीच्या उद्देशाने चोरून नेल्याची घटना घडल्याने महिलेने तत्काळ जिल्हा पेठ पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्यांवीरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.संतोष सोनवणे हे करीत आहेत.