जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५
जगभरात नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले असून आता नवीन वर्षात सोन्याने 2 हजारांची सलामी दिली. तर चांदी पण या दहा दिवसात 2 हजारांनी वधारली आहे. चांदीने मध्यंतरी ब्रेक घेतल्यानंतर या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा झेप घेतली. गेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारने मौल्यवान धातुवरील आयात शुल्कात मोठी कपात केली होती. आयात शुल्क 15 टक्क्यांहून 6 टक्क्यांवर आणले होते. तर यावेळी जीएसटीत कपातीची मागणी होत आहे. जीएसटी 3 टक्क्यांहून 1 टक्के करण्याची मागणी होत आहे. सरकारने मनावर घेतले तर मग यंदा सुद्धा दोन्ही धातुत मोठी घसरण होईल. अशी आहे सोने आणि चांदीची किंमत सोन्याने दहा दिवसांत 2 हजारांची झेप घेतली. या सोमवार, मंगळवारी भाव स्थिर होता. बुधवारी सोने 100 रुपयांनी तर गुरुवारी 380 रुपयांनी, 10 जानेवारी रोजी 270 रुपयांनी सोने महागले.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या आठवड्यात चांदी 2 हजारांनी वधारली तर 1 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वधारली. तीन दिवसात कोणताही बदल झाला नाही. तर 10 जानेवारी रोजी हजारांनी भाव वाढला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,018, 23 कॅरेट 77,706, 22 कॅरेट सोने 71,465 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,514 रुपये, 14 कॅरेट सोने 45,641 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,268 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.