जळगाव मिरर । २६ जानेवारी २०२३ ।
सध्या देशभराच्या कानाकोपऱ्यात जावून पोहचलेले बागेश्वर महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते क्रिकेटच्य मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याची माहिती असून त्यांनी यावेळी चांगलीच फटकेबाजी केल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
बागेश्वर महाराज हे आपल्या हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळत आहेत. त्यांनी पहिला चेंडू थेट प्रेक्षाकांच्या वरून टोलवला आहे. तर त्यांनी मारलेल्या आकाशातील चेंडूकडे लोकं पाहातंच राहिले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचे साधन बनले आहे.
समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट आपण ओळखतो, त्यांच्या मनात काय चाललंय ते आपण सांगू शकतो असं वक्तव्य गेल्यामुळे ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हानही दिलं आहे.