जळगाव मिरर | २४ मे २०२३
धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्रचा, येथील हिताची अस्टीमो ब्रेक सिस्टिम (इंडिया) प्रा. लि.चे कामगार बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे महासचिव ईश्वर सुमंत वाघ यांनी कंपनीस नोटीस देऊन दि. २३ मे रोजी पहिल्या पाळीपासून आपल्या कंपनीतील सर्व कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत, असे म्हटले आहे.
कंपनीतील बहुसंख्य कामगार यांनी त्यांच्या पसंतीने स्थापन केलेल्या कामगार संघटनेसोबत चर्चा न करणे, कामगारांच्या विरुद्ध खोट्या तक्रारीच्या प्राप्त करून घेऊन त्या आधारे आरोपपत्र जारी करणे, सेवेतून निलंबित करणे, शिस्तभंगाची कारवाई करणे, संघटनेच्या स्थानिक कार्यकारिणी सदस्यावर सूडबुद्धीने आकसबुद्धीने प्रशासकीय कारवाई करणे, कामगार यांनी त्यांच्या पसंतीने स्थापन केलेल्या संघटनेच्या बाबतीत ढवळाढवळ करणे आणि कंपनी आस्थापनेच्या आवारात औद्योगिक शांततेस बाधा, इजा निर्माण करून त्याचा आरोप कामगार व संघटनेवर लावणे, यासह अनेक कारणांसाठी कामगारांनी संप पुकारला आहे. या संपाचे नरेंद्र पाटील, लीलाधर नन्नवरे, योगेश नन्नवरे, प्रमोद कोळी, चंदू कोळी, हेमंत सपकाळे यांच्या नेतृत्वात हा संप पुकारण्यात आलेला आहे.