जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरात आज दुपारपासून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जळगावकर सज्ज झाले होते. शहरातील मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे गणेशभक्ताचा मोठा जल्लोष सुरु असून शहरातील भाविक बाप्पांना निरोप देण्यासाठी सकाळपासून रीघ लागली आहे. तर गेल्या दोन वर्षापासून शहरातील अनेक परिसरात गणपती संकलन केंद्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.
यंदा देखील शहरातील रामानंद नगर परिसरातील गिरणा टॉकीज चौक येथे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान जळगाव यांच्यातर्फे गणपती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या संकलन केंद्राला माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर दिवसभरात २ हजार मूर्ती संकलन याठिकाणी करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर बारी, संतोष पाटील, छोटू बाविस्कर, कैलास बारी, सागर बारी, उदय बारी, यांनी परिश्रम घेतले.