जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२४
अमळनेर तालुक्यातील धार तलावात पोहोतांना एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कंडारी येथील जयेश भरत देसले हा विद्यार्थी मारवड येथे भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर कॉलेजला शिक्षण घेत होता. यावर्षी तो बारावी वर्गात प्रवेशित असून प्रताप महाविद्यालयात प्रताप पेंटर्नला ही तो जेईई व नीट वा परीक्षांची तयारी करत होता. आज दुपारी तो अमळनेर तालुक्यातील धार येथील तलावात मित्रांसोबत पोहायला गेला होता. या वेळी पोहताना मित्र थोड्यात बचावले व ते बाहेर ही निघाले, मात्र जयेश जास्त पाणी असल्याने तेथेच बुडाला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात पोलीस व स्थानिकांना यश आले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.