जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
दूध घेवून घरी परतणाऱ्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल कृत्य करुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने तीचा विनयभंग केला. ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आईविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ती मुलगी दुकानावरुन दूध घेवून घरी जात होती. यावेळी संशयित पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या आईने त्याला दिलेल्या चिथावणीवरुन त्याने घरी परतत असलेल्या मुलीसमोर अश्लिल चाळे केले. तसेच तिच्यासोबत अंगलट करीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर संशयिताने त्या मुलीला त्यांच्या घराच्या जिन्यावरुन जात असतांना तीचा जबरदस्तीने हात पकडून तिच्यासोबत अश्लिल भाषेत बोलून तीचा पुन्हा विनयभंग केला.
दरम्यान, पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार १५ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या आईविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.