जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२४
अमळनेर शहरातील पैलाड भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पैलाड भागात एक महिला आपल्या कुटुंबासोबत राहते. २५ रोजी सकाळी ती तिच्या नातवाला अंगणात खेळवत असताना तिच्या घराशेजारील घरातून धूर आल्याने कोणत्या नालाईकाने धूर उडवला असे, त्या म्हणाल्या. या बोलण्याचा गुलाब भोई, कैलास भोई, रवींद्र भोई या तिघांनी त्या महिलेला मारहाण केली. तर रवींद्र भोई याने त्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. कैलास भोई याने लोखंडी वस्तूने त्यांच्या हातास मारून दुखापत केली. सोबतच त्या तिघांनी महिलेच्या पतीला ही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे. कॉ. गणेश पाटील करत आहेत.