जळगाव मिरर | ९ सप्टेबर २०२४
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जागृत देवस्थान असलेले श्री गोविंद महाराज यांच्यावरील आपली श्रद्धा व निष्ठा आजही कायम असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज बोलून दाखवली. दरम्यान, ना. पाटील दरवर्षी आरतीसाठी कासोदा येथे जात असतात.
श्री गोविंद महाराज यांचा सप्ताह निमित्ताने ना.गुलाबरावजी पाटील यांनी देणगी स्वरूपात मदत केली. तसेच कीर्तनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्याबद्दल श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळचे ना. पाटील यांची भेट घेत आभार मानण्यासाठी श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळचे पदाधिकारी आले होते. त्यात अध्यक्ष सोनू शेलार, उपाअध्यक्ष वाल्मिक ठाकरे, सचिव संतोष चौधरी, खजिनदार गोपाल पांडे, सचिव रवी मोरे, गोकुळ शिंपी, जितू तांदळे, सुधाम राक्षे, बबन क्षीरसागर, रमेश खैरनार, नंदू खैरनार, दगडू चौधरी यांच्यासह कासोदा ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, ना.पाटील याचे स्विय सहाय्यक हेमंत नारखेडे व नारायण आप्पा कोळी यांनी साहित्य पोहच केले होते.