जळगाव मिरर / २० जानेवारी २०२३
येथील रामेश्वर कॉलनीत २५ वर्षे जुने हरिहरेश्वर मंदिराचा ग्रामस्थांच्या वर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. नुकतेच याठिकाणी भाविकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर बांधकामाला प्रारंभ करण्यात येत आहे.
रामेश्वर कॉलनीत गेल्या २५ वर्षांपासून भगवान महादेवाचे हरिहरेश्वर मंदिर अस्तित्वात आहे. या मंदिराची थोडी पडझड झाली असून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा करून याठिकाणी मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरविले आहे. याठिकाणी नुकताच भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ५ जोडप्यांच्या हस्ते महापूजा करून भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजनांनंतर बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. जीर्णोद्धाराकरिता किशोर मांडोळे, उत्तम सूर्यवंशी, गजानन पाटील, सुरेश बडगुजर, संदीप चौधरी, नरेंद्र जाधव, दिपक सनन्से, दिपक मांडोळे, विशाल देशमुख, निवृत्ती नाथ, नरेंद्र पाटील, विजय पाटील, सुनिल वाणी, भास्कर कचरे आदि परिश्रम घेत आहे.