
जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२४
भडगाव शहरातील व तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून जेसीबीद्वारे अवैध वाळू उत्खनन सुरु असून या बाबत दि. १५ रोजी पाच अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून ही वाहने तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. ही कारवाई प्रातांधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाने तहसिलदार शितल सोलाट यांच्या पथकाने केली आहे.
सदर कारवाई भडगाव शहरातील गिरड, कराब, टोंणगाव ठिकाणी करण्यात आली. यावेळी गिरड येथील जप्त केलेले एक ट्रॅक्टर पळून घेवून जाणाऱ्या भडगाव भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करत होते. परंतु या वाळू माफियाने त्वरित अवैध वाळूचे ट्रॅक्टर खाली करून भडगाव तहसिल कार्यालयात लावले. त्यामूळे गुन्हा हा दाखल न करता त्या ट्रॅक्टरचा दीड ब्रासचा पंचनामा करण्यात आला आहे. गिरड येथील कारवाईत पथक प्रमुख तहसीलदार शीतल सोलट, नायब तहसिलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा महसूल साहाय्यक महादू कोळी, महसूल सहाय्यक लोकेश वाघ तसेच भडगाव कराब येथील कारवाईत भरत पाटील, समाधान हुल्लुळे, योगेश पाटील, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महादू कोळी, लोकेश वाघ, घोडदे येथुन वाळूने भरलेले ट्रॅक्टर आयटीआय येथे जमा केले. पथक प्रमुख भरत पाटील, शुभम चोपडा, योगेश पाटील, संजय सोनवणे, समाधान हुलुहुले, पाशा हलकारे, महादु कोळी, महसुल सेवक किरण मोरे, समाधान माळी आदींचा सहभाग होता. या कारवाई पाच ट्रॅक्टर जप्त करण्यात आले अशी माहिती महसूल विभागाने दिली.