जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२३
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्यापासून राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होती. त्यांना नुकताच वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित होतं. दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेतली नाही. त्यामुळे मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.