जळगाव मिरर । ४ ऑगस्ट २०२३
चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी आपल्या स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती याप्रकरणी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून देसाई यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 2 ऑगस्ट रोजी च्या पहाटे ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या एनडी स्टुडिओत गडफास घेतल्याचे वृत्त बाहेर येतात कला प्रेमींमध्ये मोठे हळहळ व्यक्त होत होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अखेरचे पार्थिवाचे दर्शन घेतले त्यानंतर आज सायंकाळी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी आपल्या लेखी तक्रारी द्वारे ईसीएल फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी पैशांसाठी नेहमी तगादा लावल्याने नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांनी तक्रारी केला आहे त्यानुसार फायनान्स कंपनीच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केली असे त्यांनी तक्रारीत देखील म्हटले आहे आता या प्रकरणी खालापूर पोलीस स्थानकात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.