जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते मानले जाणारे माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्यासह दोघांना कॉंग्रेस पक्षाने निलंबित केल्यानंतर डॉ.पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर चर्चा सुरु असतांना आज अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला असून आज माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, देवेंद्र मराठे यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद स्पष्ट केले होते की, आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार आहोत. दरम्यान आज बुधवार रोजी मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला.
यात डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, देवेंद्र मराठे, शैलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यासह जिल्ह्याचे पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.