जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
गेल्या तीन वर्षापासून कोरोनाच्या आजारापासून जगभरातील रुग्णांनी मोकळा श्वास घेतला असतांना आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून देशात jn.1 या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर अधिवेशनानंतर चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचे आढळले. सध्या मंत्री धनंजय मुंडे घरात क्वारंटाइन आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. मुंडे हे सध्या पुण्यातील निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील घरी आहे. मु्ंडे यांना गेल्या दोन दिवसांपासून खोकला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात मुंडे यांना कोरोनची लागण झाली.