
जळगाव मिरर | २० मार्च २०२५
देशातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात एक मोठा खुलासा झाला आहे. हा संपूर्ण कट सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगीने रचला होता असा खुलासा पोलिसांनी केला आहे. या नियोजनानुसार, प्रेमी साहिल आणि मुस्कान यांनी सौरभची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिल अत्यंत अंधविश्वासू होता. याचाच फायदा मुस्कानने घेतला. सोशल मीडियावर एक अकाऊंट तयार करून तिने साहिलची मृत आई त्याला बोलते असे भासवले आणि त्याच्याकडून ही हत्या करून घेतली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी या हत्याकांडाविषयी बोलताना, प्रियकर साहिल मुस्कानचे सर्व काही ऐकायचा. सौरभच्या हत्येचे संपूर्ण नियोजन मुस्कानने केले होते. मुस्कान मेसेजमध्ये अशा प्रकारे बोलत असे जणू काही साहिलची आई अवतार घेऊन त्याच्याशी बोलत होती. नोव्हेंबरमध्ये, मुस्कानने साहिलला सांगितले की सौरभला मारले पाहिजे. पोलिसांनी सांगितले की, नोव्हेंबरपासूनच नियोजन सुरू झाले. प्रथम हत्या केल्यानंतर मृतदेह कुठे पुरला जाईल याची जागा शोधण्यात आली. सौरभच्या कुटुंबाला त्याची पर्वा नव्हती. सौरभला घराबाहेर हाकलून लावण्यात आले. घरातील सदस्यांना सौरभची फारशी पर्वा नव्हती. सौरभही दारू पित असे. यानंतर सौरभ भाड्याच्या घरात राहू लागला.
सौरभच्या कुटुंबाला त्याची काळजी नाही हे मुस्कानला माहीत होते. अशा परिस्थितीत, जर तिने सौरभला मारले आणि त्याला पुरले तर कुटुंबातील सदस्य विचारणार नाहीत आणि ती त्यांना सांगेल की तो परदेशातून परतलाच नाही. पण त्याला जागा मिळाली नाही. यानंतर सौरभ फेब्रुवारीमध्ये भारतात येणार असल्याचे समोर आले. मुस्कानने २२ फेब्रुवारी रोजी कोंबडी कापण्याच्या नावाखाली २ चाकू खरेदी केले. मुस्कानने ८०० रुपयांना दोन चाकू खरेदी केले. यानंतर, मुस्कानने सौरभला एन्जायटी असल्याचे निमित्त केले. त्यानुसार तो जवळच्या डॉक्टरकडे गेला आणि औषध घेतले. सौरभ २४ फेब्रुवारी रोजी परतला. मुस्कान म्हणते की तिचा वाढदिवस २५ फेब्रुवारी होता.
मुस्कानने दारूमध्ये औषध मिसळून त्याला देण्याची योजना आखली. पण सौरभने दारू पिली नाही. तेव्हापासून ती वाट पाहत होती.दरम्यान, मुस्कानने तिच्या मुलीला तिच्या आईच्या घरी सोडले होते. ३ मार्च रोजी मुस्कानने तिच्या पतीला जेवणात बुशुद्धीचे औषध देऊन बेशुद्ध केले. यानंतर, तिने तिच्या प्रियकराला सौरभच्या छातीवर चाकूने हल्ला करायला लावला. यानंतर त्याचा शिरच्छेद करून त्याला ठार मारण्यात आले. दोघांनीही शरीराचे तुकडे केले. दुसऱ्या दिवशी दोघांनी बाजारातून एक ड्रम, सिमेंट आणि वाळू विकत घेतली. शरीराचे अवयव एका ड्रममध्ये टाकले गेले आणि नंतर ते सिमेंट आणि वाळूने झाकले गेले. हत्येनंतर दोघेही ५ मार्च रोजी शिमलाला गेले.
दुसरीकडे, सौरभचा भाऊ बबलूने त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बबलूने पोलिसांना सांगितले होते की, सौरभची हत्या त्याची वहिणीनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केल्याचा त्याला संशय आहे. जेव्हा मुस्कान आणि साहिल शिमलाहून परतले तेव्हा पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली. यानंतर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी सौरभचा मृतदेह ड्रममधून बाहेर काढला आणि हत्येत वापरलेला चाकूही जप्त केला. पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केली आहे.