जळगाव मिरर / १३ मार्च २०२३ ।
देशात मार्च – एप्रिल महिन्यात मोठ्या संख्येने लग्नसराई सूर असते. या दिवसात सोने- चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत 449 रुपयांची वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमवर २४ कॅरेट सोने 56, 599 रुपये व्यवहार करताना दिसत आहे. तर चांदीच्या फ्युचर किमतीत 750 रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो 63,640 रुपये झाला आहे.
पुणे – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये
मुंबई – 24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,220 रुपये
नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.