जळगाव मिरर / १ मार्च २०२३ ।
देशभरातील दूरसंचार कंपनी आपल्या ग्राहकांना विविध प्लान देवून ग्राहक टिकवून ठेवण्यात व्यस्त असतांना या वर्षाच्या मध्यापर्यंत एअरटेलच्या कॉलदरात वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी केले आहे.
‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात मित्तल यांनी सांगितले की, कंपनीमध्ये खूप भांडवल गुंतवून ताळेबंद मजबूत करण्यात आला आहे. तथापि, दूरसंचार क्षेत्रात भांडवलाच्या तुलनेत परतावा फारच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यात बदल करण्याची गरज आहे. आम्ही अल्प प्रमाणात शुल्कवाढ करणार आहोत. या वर्षाच्या मध्यापर्यंत एअरटेलचे कॉल दर महाग होऊ शकतात. २०० रुपये सरासरी उत्पन्न एका ग्राहकामागे मिळते. ३०० रुपयांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य आहे. ३० जीबी डेटावापर जवळपास मोफतच मित्तल यांनी सांगितले की, लोक नगण्य पैशांत ३० जीबी डेटा वापरत आहेत. ही वाढ फारच कमी आहे.
