जळगाव मिरर | २५ जून २०२४
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. आणीबाणी लागू करणारेच विरोधक आता आता हातात संविधान घेऊन जनतेला भूलथापा देऊन देशाचे संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले. तसेच या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशात व राज्यात सत्तेत असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रत्येक वर्षी भाजपकडून दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भुसावळ भाजप तर्फे आणीबाणी मध्ये तुरुंगावास भोगलेल्या दिलीप ओक,अरुण भावसार,रवींद्र पवार या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. देशामध्ये घटनेविरोधात जाऊन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. प्रत्येक वर्षी भाजपकडून हा दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे,भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष युवराज लोणारी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, प्रमोद सावकारे,माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन ,पिंटू ठाकूर, किरण कोलते ,विस्तारक रमाशंकर दुबे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, आनंद ठाकरे, शेखर धांडे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, अनिरुद्ध कुलकर्णी, बीसन गोहर, महिला मोर्चाच्या शैलेजा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ वसंत झारखंडे, कैलास महाजन, कैलास शेलोडे, संजय भीरुड, भैय्या महाजन,विशाल जंगले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे, धनराज बाविस्कर, राजू खरारे, जयंत माहुरकर ,शंकर शेळके, शेखर धांडे, प्रशांत देवकर ,सुमित बऱ्हाटे ,वैभव लोणारी ,कुणाल येवले , आशिष पटेल ,अनिल पाटील, अल्बर्ट तायडे,शिशिर जावळे, सचिन बऱ्हाटे, वेदप्रकाश ओझा, गोपी राजपुत, दर्शन चिंचोले, यशांक पाटील, दिपक सोनवणे,भुरा खंडारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.