जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२३
गेल्या दोनच दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची घटना ताजी असतांना आज दिल्लीत देखील भूकंपानं हादरली असून कारण दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात सोमवारी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
Earthquake again #Delhi #ncr pic.twitter.com/a6iuNgGTgG
— Amir Sikandar (@Amir_Sikand) November 6, 2023
आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचं भूकंपशास्त्र विभागानं म्हटलं आहे. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी नोंदवली गेली आहे. विभागानं दिल्लीत जाणवलेले भूकंपाचे धक्के जोरदार असल्याचं म्हटलं जात आहे. पण यामध्ये कुठलंही नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.