जळगाव मिरर | १० जुलै २०२४
राज्यातील मराठवाडा भुकंपाने हादरल्याची बातमी समोर येत आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले असून आज सकाळी सातच्या सुमारास हा भुकंप झाला. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. माहितीनुसार आतापर्यंत सर्वात मोठा आजचा भूकंप धक्का आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात आज दि.१० 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून १३ किमी असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मराठवाड्या जिल्ह्यात विवीध ठिकाणी भुकंपाचे धक्के. परभणी जिल्ह्यातील सेलु, गंगाखेड आदी भागात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुढ भुकंपाचा धक्का जाणवताच न घाबरता तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेवर थांबावे असा सल्ला प्रशासन व जाणकार मंडळीकडून दिला जात आहे.