जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मारहाणी व विनयभंगाच्या घटना घडत असतांना नुकतेच भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावातील २८ वर्षीय महिलेच्या घरात घसुन मारहाण करीत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड याठिकाणी २८ वर्षीय महिला घरात एकटी असताना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गणेश संपत भिल वय २९ हा महिलेच्या घरात शिरला, त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असतांना महिलेने विरोध केला असता तिचे तोंडू दाबून मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.