जळगाव मिरर : २४ ऑक्टोबर २०२४
राज्यात गेल्या काही दिवपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु होता. आज शरद पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात जळगाव जिल्ह्यातील देखील जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर व जामनेर विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले असून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जळगाव शहरात माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चे बांधणी ठाकरे गटात सुरु होती. गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुरु असताना हा तिढा अखेर पूर्ण झाला असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी फायनल झाली आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी ‘जळगाव मिरर’ शी बोलताना सांगितले आहे.