जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।
देशभर आज राम नवमीचा उत्सव सुरु असतांना एक मोठी बातमी मध्यप्रदेशातून समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक लोक विहिरीत पडले. पोलिस आणि भाविकांनी दोरीने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 18 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, विहीर किती खोल आहे आणि त्यात पाणी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एका हवनाच्या वेळी घडली. विहिरीच्या छतावर 25 हून अधिक लोक बसले होते. वजन जास्त झाल्याने छत तुटले आणि लोक खाली पडले. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांशी फोनवर चर्चा केली. बचावकार्याला गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
हि बातमी अपडेट होत राहील
