जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।
देशात राम नवमी साजरी होत असतांना इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहीरी वरील छत कोसळून त्या विहिरीत अनेक लोक पडल्याची घटना घडल्यानंतर दुसरी बातमी आंध्र प्रदेशमधून समोर आली आहे. आंध्र प्रदेशमधील वेणुगोपाल स्वामी मंदिराला भीषण आग लागली आहे. पश्चिम गोदावरी येथील वेणुगोपाल स्वामी मंदिराला रामनवमी उत्सवादरम्यान ही आगीची लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
#WATCH आंध्र प्रदेश: पश्चिमी गोदावरी के वेणुगोपाला स्वामी मंदिर में राम नवमी के उत्सव के दौरान आग लग गई। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/fVgVSrtRc3
— ANI_HindiNews (@AHindinews) March 30, 2023
वेणुगोपाल मंदिर परिसरात रामनवमीसाठी तयार करण्यात आलेल्या पंडालमध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. भाविकांना वेळीच मंदिरातून बाहेर काढण्यात आले असले तरी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
