जळगाव मिरर / ३ फेब्रुवारी २०२३
शहरातील एका परिसरातून चोरट्यांनी हजारो रुपयांच्या बकऱ्या भरदुपारी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुना कानळदा रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी नगरातील रहिवासी सागर किसन सातव (वय 33) यांच्या मालकीचे बकऱ्या दि.2 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 हजार रुपये किंमतीच्या एकूण 3 बकऱ्या चोरी झाल्या असून संपूर्ण 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्थानकात सागर सातव यांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना योगेश पाटील हे करीत आहेत.