जळगाव मिरर | ५ जुलै २०२३
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने थेट भाजप व शिंदे गटासोबत युती करीत सत्ता स्थापन करीत राष्ट्रवादीत मोठी फुट पडलेली असतांना आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत दोनवेळा मुख्यमंत्रीपदाची आलेली संधी गमावली. अन्यथा यापूर्वीच महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री लाभला असता, असे शल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधताना व्यक्त केले. शरद पवारांनी वसंत पाटलांना बाजूला सारून मुख्यमंत्रीपद मिळवले. तेव्हापासून नागरिकांनी त्यांची साथ दिली. पण प्रत्येकाचा एक काळ असतो. आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन आराम करावा. आपला हट्टीपणा सोडावा, असेही ते यावेळी म्हणाले. ही वेळ आपल्यावर का आली, शरद पवार हे आपले श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे स्वराज्य आपल्याला तयार करता आले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. वसंत पाटील यांचे सरकार बाजूला सारले आणि सरकार स्थापन केले. शरद पवारांनी अनेक पक्ष काढले आणि त्यांना लोकांनी राज्याच्या राजकारणात योग्य स्थान दिले. १९८६ ला समाजवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केले, त्यांनापद मिळाले नाही, पण त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले. केंद्रात मंत्रिपद मिळाले. १९७८ पासून शरद पवारांनी लोकांनी साथ दिली आहे. प्रत्येकांचा एक काळ असतो असे म्हणत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. अजितदादांनी विलिनिकरणांचा इतिहास सांगितला आहे.मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही असे म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले की,सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला आणि काही दिवसांनी त्यांच्यासोबत काम केले असे सांगताना अजित पवार सांनी शरद पवार यांचा राजकीय प्रवास सांगत खोचक टोला लगावला आहे.२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी आली होती तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडण्यात आले नाहीतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यात राहिला असता. २०२२ वेळाही संधी आपण सोडली असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले की, २०१९ मध्ये भाजपसोबत ५ बैठका झाल्या होत्या. मात्र तेव्हा पुढे बोलण्यासाठी जाऊ दिले नाही. असे म्हणत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांची तयाार होती पण मध्येच भूमिका बदलण्यात आली. भाजपमध्ये ७५ व्या वर्षी रिटार्यमेंट घेतली असे म्हणत अजित पवार म्हणाले की शरद पवार ८३ वर्षांचे झाले आता थांबणार कधी, त्यांनी आता सल्लागार व्हायला हवे, असे म्हणत शरद पवार यांनी थांबयला हवे असे अप्रत्यक्षपणे सांगितल आहे. मी महाराष्टाला कधी खोटं बोलणार नाही, खोटे बोलेल तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली. पण मला सांगण्यात आले कुणाला काही सांगायचे नाही असे सांगून मला शासंत केले. २०१७ ला शिवसेना जातीयवादी वाटत होती म्हणून भाजपसोबत न जाण्याची भूमिका मोठ्या नेत्यांनी घेतली आणि नंतर शिवसेनेसोबत जात भाजप जातीयवादी कसे वाटले. मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते की शिवसेनेत नाराजी आहे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा दावाही त्यांनी केला आहे.