जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।
शहरात गेल्या अनेक दिवसापासून घरफोडीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. नुकतेच एमआयडीसी परिसरातील जगवानी नगरात राहणाऱ्या वृद्धाच्या उघड्या घरातून मध्यरात्री ८० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील जगवानीनगरात निवृत्ती नथू पाटील (वय ८०)हे राहत असून त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजता ते ८ एप्रिल दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हि रोकड मलकापूर तालुक्यातील हिवरा येथील एका महिलेने चोरून नेल्याचा संशय निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता निवृत्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोकॉ जितेंद्र राजपूत तपास करीत आहे.